मौजे कोणे गावात शिक्षणाची चांगली परंपरा आहे. गावात झेड.पी. प्राथमिक शाळा आहे, ज्यात १ली ते ७वीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी हरसूल, गिरणारे किंवा त्र्यंबकेश्वर येथे जातात.
गावातील साक्षरतेचे प्रमाण सुमारे ६७% आहे. मुले आणि मुली दोघेही शिक्षणात पुढे आहेत. शाळेत मध्यान्ह भोजन योजना, वाचनालय व क्रीडा साहित्याची सुविधा आहे. शिक्षक नियमित उपस्थित राहून विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन करतात.
शिक्षणाबद्दल गावकऱ्यांची जागरूकता वाढल्याने नव्या पिढीमध्ये शिक्षणाबरोबर संस्कारांची जपणूक दिसून येते.